डिसेंबरचा उत्तरार्ध हा केवळ ख्रिस्ती मंडळींचा वा युरपिय मंडळींचा नव्हे, तर जगभरात अनेक देश, धर्म नि वंशांच्या सणांचा काळ आहे (पूर्वार्ध)
ख्रिसमस हा डिसेंबरचा एकमेव सण तर नाहीच, पण तो पहिलाही नाही. उत्तर गोलार्धातील सेंट ल्युसिआ डे, रोमन परंपरांमधील सॅटर्नेलिआ, बहुदेवतापूजक धर्मांतील यूल, ज्यू धर्मियांचा होनेका, चीन आणि जपानमधील डॉंग-झी, इराणमधील शब-ए-याल्दा, जपानमधील टोजी, द.कोरियामध्ये ‘धाकटा नव-वर्षदिन’ म्हणजे डोंगजी हे सण याच सुमारास साजरे केले जातात.......